डॉ. विनायक सुकदेव बावसकर

 • डॉ. विनायक सुकदेव बावसकर
 • जन्म: १६ जुलै १९४१, पुणे
 • शिक्षण: बी. एस्सी.(कृषी) १९६१, पुणे.
 • एम. एस्सी.(कृषी) - मृदशास्त्र (सेंद्रिय शेतीवर) - पुणे विद्यापीठ १९६६
  एम. एस्सी. चा प्रबंध (संशोधनाने) विविध जनावरांचा शेणांचा व टाकाऊ पदार्थांचा जमिनीचा भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात व उत्पादनावर तुलनात्मक अभ्यास आणि दिर्घकालीन प्रयोगांचा जमिनीच्या गुणधर्मातील झालेल्या बदलांवर अभ्यास.
 • पीएच. डी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी -१९७६
  पीएच. डी. चा प्रबंध अँटीबायोटीक कारखान्यांतील टाकाऊ पदार्थ (पी.एम.आर.) याचा जमिनीच्या गुणधर्मांवर व पिकांच्या वाढीवर परिणाम. सर्व शिक्षण स्कॉलरशीपवर
 • नोकरी : ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे नोकरीची सुरुवात १९६१-६४ कृषी खाते महाराष्ट्र राज्य १९६४-६७
 • प्राध्यापक : मृद व कृषी रसायन, कृषी महाविद्यालय, पुणे- १९६७-७५.
 • पदव्युत्तर प्राध्यापक, शास्त्रज्ञ - सॉईल, फिजीस्ट व बायोकेमिस्ट, पाडेगाव १९७५-८०.
 • प्राध्यापक : मृद व कृषी रसायन कृषी महाविद्यालय, घुळे - १९८१-८२
 • ६ एप्रिल १९८२ रोजी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देऊन 'प्रयोगशाळा ते शेतावर' असे विविध पिकांसाठी स्वस्त, उत्तम टेक्नॉंलॉजी देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, भूक व दारिद्र्य हटविण्यासाठी उच्च पदाच्या नोकरीचा राजीनामा.
 • पहिल्या इयत्तेपासून पीएच.डी .पर्यंत (१९४६ ते आजतागायत) शेती शिक्षण, संशोधन व विकासासाठी कार्यरत.
 • सेंद्रिय शेती, फलोत्पादन, मृद, पाणी, वनस्पती पोषण, रोग व कीड निवारण, द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी देशभर उत्पादीत करण्यात यशस्वी. विविध फळपिके, भाजीपाला, फळभाज्या, फुलशेती, वनशेती, व्यापारी, अपारंपारिक पिके, पॉलिहाऊस, नर्सरी संशोधन, निसर्ग पर्यावरण, पाणी, आयुर्वेद औषधी वनस्पती, प्रक्रिया उद्योग, भारतीय शेती व गरीब राष्ट्रांच्या उपयुक्त २१ व्या शतकासाठी उच्च तंत्रज्ञान विकसित 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी.'
 • संपादक -कृषी विज्ञान : शेतकऱ्यांचे केसपेपर करून अचूक सल्ला व उपाय. वेगवेगळ्या पिकांवर संशोधन आणि शेतकऱ्यांने प्रत्यक्ष अनुभव फोन, पत्त्यासह 'कृषी विज्ञान' द्वारे प्रसारित. नुसते ज्ञान न देणारे, तर सर्वांगीण विकास घडविणारे मासिक.

  डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला मिळालेले पुरस्कार
 • राष्ट्रीय पुरस्कार
 • उद्योग प्रगती अॅवॉर्ड -१९९५
 • आर्क ऑफ एक्सलन्स अॅवॉर्ड -१९९५
 • भारत विकास एक्सलन्स अॅवॉर्ड -१९९६
 • विजयश्री अॅवॉर्ड -१९९६
 • भारत गौरव अॅवॉर्ड -१९९६
 • कृषी भुषण अॅवॉर्ड -२००३
 • आंतरराष्ट्रीय पुरस्कार
 • विकास रत्न अॅवॉर्ड (ग्लोरी ऑफ इंडिया) १९९४, नवी दिल्ली
 • हिंद रतन स्वोर्ड ऑफ ऑनर - १९९६, बहरीन
 • इंटरनॅशनल गोल्ड स्टार अॅवॉर्ड - १९९७, अबुधाबी
 • राष्ट्रीय रतन अॅवॉर्ड - १९९७, ऑस्लो (नॉर्वे)
 • डॉ. मेघनाद सहा पुरस्कार - २००९ (कोलकत्ता)
 • इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर - १९९७ - ९८, केंब्रीज (इंग्लंड)
 • २१ व्या शतकाचे दर्जा व गौरव ( Quality & Prestige) स्पेन या राष्ट्राचा (अॅक्च्युलॉईड) - विएन्ना (ऑस्ट्रीया) २००४, पुरस्कार जाहीर
 • २० व्या शतकातील 'हु इज हु' (Who is Who) या जागतीक संदर्भ ग्रंथात कार्याचा विशेष गौरवपुर्ण उल्लेख.


 • 'सिद्धी विनायक' सेंद्रिय बिजोत्पादन प्रयोग देशात सर्वप्रथम -
  आळू, केळी, कढीपत्ता, लिंबू, सिताफळ, रामफळ, जांभूळ या फळावर संशोधन चालू. सिद्धी विनायक मोरिंगा शेवगा विकसीत. जगभरातील गरीब, आदिवासी शेतकऱ्यांना व आंतरापिकात एकरी दरवर्षी १ ते १।। लाख रुपये उत्पादन मिळविलेले देशभर २००० हून अधिक यशस्वी मॉडेल्स. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रतिकुल परिस्थितीत देखील दर्जेदार, निर्यातक्षत उत्पादन घेणारे देशभर ७००० मार्गदर्शक मॉडेल्स उपलब्ध.


 • वैशिष्ट्येपुर्ण भाषणे :
  डॉ. बावसकर स्वत:च्या संशोधनावर १९८० साली भारत सरकारच्या नवी दिल्ली IARI संस्थेने देशातल्या सर्व कृषी विद्यापीठातील निवडक शास्त्रज्ञांना भाषण देण्यासाठी निमंत्रीत केले. तेथे भाषणाचे साऱ्यांनी कौतुक केले. (सप्टेंबर १९८१) (संदर्भ - इंग्लिश काव्य पान नं. २०५)
 • Indian Science Congress कलकत्ता येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर शास्त्रज्ञांसाठी भाषण.
 • इंडियन सायन्स काँग्रेसच्या (कलकत्ता) तरूण शास्त्र (कृषी) निवड करण्यासाठी परिक्षक (Jury) म्हणून १९९८ साली काम केले.
 • भारतातील राज्याचे विभागीय कमिशनर यांचेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर भाषण देण्याकरिता त्यावेळचे यशदाचे (यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे महाराष्ट्र) उपसंचालक श्री. राजेंद्र चव्हाण यांनी डॉ.बावसकर सरांना निमंत्रित केले होते. ते भाषण सर्व कामिशनरांना आवडले व सर्वांगीण विकास सरांनी संगितलेल्या नियोजनाने करण्याचा मानस व्यक्त केला.
 • प्रा. डॉ.बावसकर सरांचे वरील विषयावर विद्यापीठतील सर्व विज्ञान शाखांचे प्रमुख शास्त्रज्ञ, सर्व विषयाचे प्राध्यापक, सर्व स्टाफ यांचेसाठी डॉ. का. रा. सोनार विभाग प्रमुख, मृद व कृषी रसायन शास्त्र विभाग, म.फु.कृ.वि., राहुरी यांनी आमंत्रीत केले होते. ३ तासाचे व्याख्यानाने सारे भारावून गेले व त्यानंतर २ तास प्रश्नोत्तराचा तास झाला. सर्वांना सरांचे विचार, कल्पना आवडल्या.
 • देशातील, परदेशातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विकास अधिकारी, बँक, कारखाने, प्रशासकीय कमिशनर, कलेक्टर, प्लॅनिंग कमिशन यांना वेळोवेळी मार्गदर्शन.
 • ५०० हून अधिक विविध राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर परिसंवाद, मेळावे यामध्ये मार्गदर्शन.
 • २०० हून अधिक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर परिसंवाद, शेतकरी मेळावे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्स, वृत्तपत्रे, मासिके यामध्ये ४०० हून अधिक लेख प्रसिध्द.


 • विदेशी दौरे :
 • दुबई, बहरीन, कुवेत, मस्कत (ओमन), अबुधाबी या आखाती राष्ट्रांचा शेती उप्तादन निर्यात करण्यासाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा वरीष्ठ सभासद म्हणून दौरा - १९९६.
 • इस्त्राईलचा दौरा - १९९६, इस्त्राईलचे कृषीमंत्री अम्बॅसेडर यांचे कडून कार्याचा गौरव व मार्गदर्शनासाठी विनंती.
 • अमेरिकेचा दौरा (२ वेळा) - २००१, २००४ येथील USDA शास्त्रज्ञांकडून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा गौरव व त्या देशांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती.


With Dr.Vijay Bhatakar, Senior Computer Scientist
New Articles
more...