कोकणात एक एकरातून 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ६० - ७० हजार पहिल्या वर्षी उत्पन्न

श्री. ओंकार शांताराम गिजे, मु. पो. देवघर म्हसळा, जि. रायगड- ४०२१०५. मोबा. ९२७२२५२५६४

मी प्रथमच आमच्या २।। एकर शेतात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ज्ञान मला कृषी प्रदर्शनात 'कृषी विज्ञान' या मासिकातून झाले. त्यानंतर कृषी विज्ञानची अनेक मासिके मी खरेदी केली. शेतकऱ्यांचे अनुभव, विविध पिकांवरील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर याची माहिती मिळवली व मी आमच्या गावी शेवग्याची लागवड करण्याचे ठरविले. त्यासाठी नाशिकमधील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रामधून मोरिंगा शेवग्याची तीन पाकिटे व सर्व (सप्तामृत) औषधे (प्रत्येकी ५०० मिली) घेतली. कल्पतरू खतही ३ बॅगा घेतले नंतर गावी जाऊन सरांच्या तंत्रज्ञानाने मोरिंगाच्या लागवडीसाठी प्रथम ६ x ६ फुटावर खड्डे खणले, त्यात कल्पतरू, शेणखत, कंपोस्टखत व बुरशीनाशक पावडर अगोदर (जूनच्या सुरुवातीलाच) घातले व त्यामध्ये मोरिंगाचे बी लावले. पाऊस पडल्यानंतर बी रुजले.

पुस्तकातील माहितीप्रमाणे छाटणी केली व औषधांची फवारणी करत राहिलो. कोकणात पाऊस व वारे जास्त असल्यामुळे खोडांना आधावा द्यावा लागला. त्यानंतर साधारण ७ - ८ महिन्यांत पीक तयार झाले. शेंगा अतिशय मांसल, हिरव्यागार होत्या. शेंगा तयार होतील अशी त्यांची काढणी केली. माल तालुक्याच्या ठिकाणीच विकला. किलोमागे ३० - ४० रू. भाव मिळाला.

वर्षातून दोनदा पीक येते. मी ६ - ६ महिन्यांतून कल्पतरू खत वापरतो व सप्तामृत औषधांची नियमित फवारणी करतो, त्यामुळे चांगले उत्पादन मिळते. आतापर्यंत मला या एका एकरामधून ६० -७० हजार रू. उत्पन्न मिळाले आहे. म्हणून मी आता अजून क्षेत्र वाढवून जास्त उत्पादन घेणार आहे व इतर लोकांनाही लागवडीस पोत्साहित करणार आहे.

New Articles
more...