सिद्धी विनायक मोरिंगा शेवग्याच्या २ पाकिटांचा संसाराला आधार
																श्री.मारुती पोपट खुळे, मु.पो.फुलगाव, ता.हवेली, जि.पुणे
    मोरिंगा शेवग्याची २ पाकिटे बी पिशवीत लावण्यापुर्वी जर्मिनेटरची प्रक्रिया केली. पिशवी
    भरताना पोयटा माती व कल्पतरू खताचा १-१ चमचा टाकला होता. उगवण ८-१० दिवसांनी पुर्ण
    झाली. बी उगवून येईपर्यंत झारीने २ दिवसांच्या अंतराने पाणी देत होतो. उगवून आल्यानंतर
    पंचामृत औषधे २ वेळा झारीतून (५ लि. पाण्यामध्ये प्रत्येकी ५ मिली एकदा व दुसर्यांदा
    १० मिली) सोडले. त्यामुळे रोपांची निरोगी वाढ होऊन सव्वा महिन्यात १' x १' x १' च्या
    खड्डयात ८' x ८' अंतरावर १० गुंठ्यामध्ये लागवड केली. जमीन मुरमाड आहे. पाणी बोअरचे
    दर ८ दिवसांनी देतो. १ महिन्याच्या अंतराने २-३ वेळा १०० ग्रॅम कल्पतरू खत प्रत्येक
    रोपास टाकले. झाडे ५ महिन्याची असताना प्लॉट शेजारी ऊस असल्याने त्याच्यावरील मावा
    शेवग्याचे झाडावर आला होतो. तेव्हा पंचामृताची १ फवारणी केली. त्याने मावा गेला . फुलकळी
    मोठ्या प्रमाणात लागली. ७ महिन्यांनी शेंगा चालू झाल्या. ३-४ तोडे चार दिवसांचे अंतराने
    झालेत. सुरुवातीला १० किलो शेंगा निघत आहेत. वाद्या मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत.
    त्या मोठ्या होण्यासाठी कल्पतरू खत ५० किलोची बॅग घेतली आहे. १५ रू. किलो भावाने शेंग
    जाते.
    भिमा कोरेगाव (शिरूर) बाजारात किरकोळ ५ रू. पावशेरने आई, वडील शेंगा विकतात. झाडे ८
    ते १० फुट उंचीची आहेत. शेंगा एवढ्या लागल्या आहेत की, प्रत्येक झाडाला डेंगे (आधार
    देणे) लावले आहेत. झाडे लहान असूनही साधारण १२५ ते १५० शेंगा प्रत्येक झाडावर आहेत.
																
															
