पाचव्या आवृत्तीच्या निमित्ताने...

प्रा. डॉ. वि. सु. बावसकर

प्रदीर्घ संशोधनातून शेतकर्‍यांना शेती फायदेशीर व्हावी म्हणून संशोधन, सर्वेक्षण, कृषी विकास शिक्षण व नवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी अनेक वर्षाच्या तपश्चर्येतून उन्नत शेतीचे (Intensive Agriculture) प्रयोग केले. परंतु ऊस शेती म्हणजे अधिक पाणी व अधिक रासायनिक खते म्हणजे आळशी पीक हे राजकारणी लोकांचे पीक झाले. उसाचे सुरुवातीला मिळणारे एकरी ८० टनाचे उत्पादन ३०टनावर आले. एक एकर उसासाठी लागणारे पाणी हे १ हजार लोकांना वर्षभरासाठी पुरते. म्हणजे देशातील एकूण लक्षावधी ऊस क्षेत्रासाठी लागणारे पाणी हे ६० ते ७० कोटी लोकांना सहज पुरेल. तेव्हा ६० ते ७० कोटी लोकांना लागणारे पाणी हे फक्त ऊस या पिकासाठी देणे कितपत योग्य आहे ?

गेली ५- ६ वर्षात पर्जन्यमान कमी झाले तसेच १।। -२ महिन्यांनी पुढे गेले. रोज महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा जनतेला दु:खाच्या कळा आणत आहेत. दुष्काळ हा खरे तर मानवनिर्मित म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु शिरपूरसारखे दुष्काळातून मार्ग काढणारे मॉडेल ही याच देशात आहे. हिवरे गाव येथे बाराही महिने हिरवी शेती वार्‍याच्या तालावर डोलते आहे. ज्या राळेगण सिद्धीला दारूचे पाट वहात होते तेथे समृद्धीचे मार्ग खुले झालेत. हे चित्र ग्राम सहभागातून एकजुटीने प्रामाणिक कष्टातूनच साकारले आहे. तेव्हा असे चित्र देशभर बदलविण्यासाठी अजून पाच वर्ष लागतील. आज नद्या नाले, धरणे ७५% महाराष्ट्रात कोरडी झाली आहेत. देशात ही परिस्थिती काहीशी विषम आहे. भूगर्भातील पाणी अजून २ वर्षानी इस्त्राईलसारखी पर्जन्याची परिस्थिती निर्माण करेल. आज आमण ज्याभागामध्ये नद्यांना पाणी आहे तेथील पाणी रेल्वेने दुष्काळी भागात पोहचविण्याचे प्रयत्न चालू असल्याचे ऐकतो. परंतु असे पाण्याचे कायमचे वाटप जनतेला व सरकारला न परवडणारे आहे.

आर्थिक उन्नती साधावी. अर्थकारण करताना समाजकारणाला तिलांजली न देता राजकारण करावे. म्हणजे ते राज्यकारण देशकारण होईल. यातून राज्य, देश कसे चालवावे हे समजेल.

जमिन, शहरीकरण, औद्योगिकीकरण व इतर अर्थव्यवस्था आणी लोकसंख्येमधील होणारी वाढ आधुनिक विकास यामुळे जमीन व पाणी या दोन्हीवर ताण पडून आज भूगर्भातील पाणी ५% वर आलेले आहे. पर्यावरणाच्या समतोलावर ओझोनचा थर कमी होऊन ग्लोबर वार्मिंगच्या समस्या 'तांबडा दिवा' घेऊन उभी आहे. त्याचा हिरवा दिवा होण्यासाठी रेनट्री, हिरवळीच्या खतांची, बरबड्यासारख्या नत्र स्थिरीकरण करणार्‍या तणांची गरज आहे. जमीन सुधारण्यासाठी विकसीत व विकसनशिल राष्ट्रांनी या सुचनांची दखल घेणे गरजेचे आहे. एका बाजूला शेतीचा विकास, व्यापारीकरण,गुणवत्ता व शेतीमालाचे मुल्यवर्धन यावर आपला भर आहे. परंतु निसर्ग साथ देत नाही म्हणून पाण्याचा वापर जाणीवपुर्वक काटेकोरपणे करण्यामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचन १००% अनुदानावर करणे अत्यावश्यक आहे. परंतु अशी व्यापारी पिके की जी हलक्या जमिनीत व कमी पाण्यावर साथ देतील आशा पिकांचे संशोधन, विकास, प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये बिंबविणे अपरिहार्य आहे. अशातून शेवगा या पिकावर आम्ही संशोधन करून तिसर्‍या जगातील गरीब राष्ट्रांचा कल्पवृक्ष म्हणून सिद्ध केला. यावर प्रदीर्घ अभ्यास, चिंतन, संशोधन केंद्रावर संशोधन करून त्याचे विस्तारीकरण देशाच्या पथदर्शक (Pilot), प्रात्यक्षिक (Demo) प्लॉट असे हजारो शेतकरी या विज्ञानाचे जागृती (Awareness), प्रयोगशिलता (Experimentation), परिसंवाद, शतकरी मेळावे, शिवारफेरी, गावोगावी वैज्ञानिक शेतकरी मंडळे स्थापन केली आणि प्रयोगशिल ३० -३० शेतकरी यांचा गट निर्मात केला. तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची कृषी विज्ञान मंडळे स्थापन केली आणि अनेक पारंपारिक व व्यापारी पिकांपेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड देशभरातील हजारो शेतकर्‍यांनी गेल्या २० वर्षात केली.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचीच्या तंत्रज्ञांनी, कर्मचारीवृन्दांनी, विविध देशातील, विविध सरकारी, निम सरकारी, बँक सहकारी, विकास स्वयंसेवी संस्था (N.G.O.), कृषी विकास अधिकार्‍यांनी नुसता या कार्यास हातभार लावला नाही तर स्वत:चे घरचे कार्य समजून एखाद्या झपाटलेल्या मिशनरीसारखे काम चालू ठेवले. म्हणून हे आज त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून उभे राहिले आहे. त्यांनी या जगन्नाथाच्या रथाला गतीमान केले आणि ही पताका आपणास अजून अधिक पुढे न्यायची आहे. अनेक शेतकर्‍यांच्या मुलाखती कृषी विज्ञानमधून प्रकाशीत केल्या. त्या इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायक ठरत आहेत.

आज नववर्षाच्या सुदीना ही सुधारित पाचवी आवृत्ती जगभरातील शेतकर्‍यांसाठी, करार शेती करणार्‍यांसाठी, पर्यायी पीक शोधणार्‍यांसाठी जेथे पाणी कमी व हलकी जमीन आहे व अशा राज्यांमध्ये कमी पाण्यावर येणार 'सिद्धीविनायक' शेवग्याचे पीक शेतकर्‍यांचे दु:खाश्रु पुसून आनंदश्रुत रूपांतर करणार आहे. अशा रितीने शेवगा हा भाजी किंवा आरोग्याचा दागिना न राहता आपल्या दूरदृष्टीने शेतकर्‍यांना १ रू. खर्चुन १०० रू मिळावे हे मुल्यवर्धीत समीकरण साध्य होण्यासाठी जनतेने यापुढेही सहकार्य करावे हीच आशा !

New Articles
more...