प्रतिकूल जमीन व हवामानात ३० गुंठे क्षेत्रातून
सतत सात वर्षे 'सिद्धीविनायक' शेवगा (मोरिंगा) चे
दरवर्षी १ लाख तर आंतरपिकांचे ४० ते ६० हजार -सार्‍या राज्याला एक आदर्श मॉडेल

श्री. वसंतराव निवृत्ती काळे,सर्व्हे नं. २६, महंमदवाडी रोड, ससाणेनगर, हडपसर, पुणे-२८.फोन(०२०)२६८२४२३८

आठ वर्षपूर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पुस्तके माझ्या वाचण्यात आली. त्यातून बरीचशी माहिती मिळाली. त्यावरून माझ्या डोक्यात विचार आला की, आपणही 'सिद्धीविनायक' शेवगा लावावा. त्याप्रमाणे विचार करून ७ वर्षापूर्वी (फेब्रुवारी २००३ मध्ये) 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा बियाची ५ पाकिटे आणली. मातीमध्ये थोड्या प्रमाणात बीएचसी १० % आणि कल्पतरू सेंद्रिय खत मातीत मिक्स करून पिशव्या भरल्या बी जर्मिनेटर ५० मिली + अर्धा लि. पाणी या द्रावणात २४ तास भिजत ठेवून नंतर सावलीत सुकवून बिया पिशवीत वरून अर्धा इंच खोल हाताच्या अंगठ्याने खोचल्या. पहिले सात दिवस दररोज पाणी दिले. ८ दिवसानंतर दिवसाड पाणी दिले. नंतर सर्व बी एकसारखे उगवून आले. उगवणीनंतर पाण्याच्या झारीने दररोज पाणी दिले. झारीने पाणी दिल्याने रोपे वाकली नाहीत. पिशव्यांना खड्डे पडले नाही. त्यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पंचामृत होते. त्याची दर आठवड्याला फवारणी केली त्यानंतर हवामान उष्ण असल्याने रोपांची वाढ चांगली झाली. नंतर पुन्हा १५ पाकिटे बी आणले. त्यांची वरीलप्रमाणेच निगा राखून रोपे तयार केली. एप्रिल महिनाअखेरीस अचानक पाऊस पडला होतो. जमीन नांगरून तयार होती. ८'x १०' अंतरावर २'x २' चे खड्डे खोडून पूर्व-पश्चिम अशी रोपे लागवड सुरू केली. जशी रोपे तयार होतील तशी मी प्रथम पाऊण एकराची लागवड पूर्ण केली. त्यानंतर काही रोपे शिल्लक होती. एका ठिकाणी लोकवस्ती दाट असल्याने पड जमीन होती. गावच्या डुकरांचा त्रास होता. तेथे माझी स्वतंत्र विहीर होती. पाण्याची सोय होती. अशा परिस्थितीत मी ६' x १०' वर रहिलेल्या सर्व रोपांची लागवड केली आणि रोपे कमी पडलेल्या ठिकाणी सीताफळांची रोपे लावली. अशा रितीने 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड पुर्ण झाली.

शेवगा लागवड झाल्यानंतर झाडे जोमाला लागली पहिल्या वर्षी मी झाडे ५ फुटाची झाल्यानंतर वरचे शेंडे कोवळ्यापणीच खुडले.शेंडे खुडल्यानंतर झाडाच्या बुंध्यातून ५ फुटापर्यंत नवीन फांद्या फुटल्या. काही झाडांना जास्त फुटल्या तर काहींना कमी फुटल्या. २ ते २।।फुटाच्या फांद्या झाल्यानंतर झाडांना फुलाचा बहार सुरू झाला. त्यानंतर त्या फुलातून बारीक बारीक सुई ते सुतळीच्या आकारच्या शेंगा धरू लागल्या. शेंगा मोठ्या होऊ लागल्यावर झाडाच्या फांद्या आपोआप खाली येऊ लागल्या, वाकल्याने झाडे एका बाजूला झुकू लागली. त्यासाठी झाडाच्या बुंध्यापासून अर्धाफुट बाजूला आधारासाठी बांबुची जाड काठी रोवली. काठी रोवल्यावर दोन ठिकाणी झाड आणि काठी खाली आणि वर बांधले. सुतली बांधताना ती सैल बांधली. कारण ताणात बांधल्यास झाडास करकोचा पडतो आणि त्यठिकाणी वार्‍याच्या झोकाने झाड मोडते. नवीन-नवीन झाडाचे खोड मोठे होईपर्यंत बांधलेल्या सुतुळीवर स्वतः जातीने लक्ष दिले. त्यामुळे झाडाची खोडे मोठी होऊ लागली. त्याचबरोबर झाडांना भरपूर शेंगा आल्या. जास्त शेंगा आलेल्या झाडांना ओझे पेलत नाही असे वाटताच त्यांना जाड काठ्यांचा आधार दिला. एक वर्षाचा वहार झाल्यावर आणि खोडे जाड झाल्यावर झाडांच्या काठ्या सोडून टाकल्या.

सतत ७ वर्ष पालेभाजीचे आंतरपीक


आमच्या झाडांना कमी -अधिक प्रमाणात बाराही महिने शेंगा मिळत आहेत अतिवृष्टी आणि जोराचा वारा झाल्यास शेंगा गळून जातात, परत नवीन मोसम येण्याची वाट पहावी लागते. आमचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत फवारणीवर महिन्याचे-महिन्याला लक्ष असते. आज रोजी आमची झाडे ७ वर्षीची झाली आहेत. झाडाभोवती चाळणी (कुद्ळीने खणून) करत असतो आमच्याकडे कुठलीही मशनरी नाही. त्या चाळणीचे (मजुरीचे) पैसे वसुलीसाठी त्यात आम्ही आंतरपिके घेतो. आंतरपिकमध्ये आम्ही कोथिंबीर, मेथी, पालक ही पिके घेत असतो. यामध्येही प्रामुख्याने कोथिंबीर पीक घेणे फायदेशीर ठरते. कारण शेवग्याच्या शेंगा खाली पडत असतात. कोथिंबीरीचे पीक ४ ते ५ इंच वाढत असल्याने शेंगा गोळा करताना कोथिंबीर पायाने तुडविली गेली तरी ती दुसर्‍या दिवशी उभी राहते. पाणी दिल्यानंतर दोन दिवसांनी शेंगा तोडतो. त्यामुळे कोथिंबीरीचे (चिखलात तुडवणीने) नुकसान होते नाही.

कोथिंबीरीचे बियाने आम्ही गावरान (वाई धना) वापरतो. धना बी आणल्यानंतर चांबड्याचे चप्पलने ते रगडतो. जर्मिनेटर १०० मिलीचे २० लि. पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये ४० किलो बियाणे १२ तास भिजत ठेवतो. नंतर सुकायला टाकतो. सुकल्यानंतर शेतात बी टाकतो व पहिले पाणी देतो. त्यानंतर त्याची उगवण आपल्या जुन्या पद्धतीपेक्षा २-३ दिवस लवकर, एकसारखी व जोमदार होते. आम्हाला हडपसर मार्केट जवळ असल्याने आणि कोथिंबीरीचे पीक लवकर येत असल्याने आम्ही साधारण ३०-३५ दिवसात कोथिंबीरीची काढणी करून विक्री करतो. हे दुय्यम (अंतर) पीक काढणीनंतर चाळणी करतो. त्यामुळे जमीन भारी काळी असूनही पाण्याचा निचरा चांगला होऊन हवा खेळती राहते. त्यामुळे शेवग्यास पाणी जादा होत नाही. तसेच चाळणीमुळे बागेत कधीच आपणास तण दिसणार नाही. त्यमुळे निंदणीचा खर्च वाचतो.

बाजारात १०० ते २०० रू शेकडा बाजारभाव असला तरी आमची शेवग्यातिल कोथिंबीर ३०० ते ५०० रू. शेकडा जाते. कोथिंबीरीचा कलर व सुगंध पाहून गिर्‍हाईक लगेच माल घेते. विक्रीस काहीच वेळ लागत नाही. काही वेळेस बाजार वाढला, तर १००० रू. शेकडा भावानेही जाते. आम्ही बाराही महिने शेवग्यात कोथिंबीर करतो. वर्षातून पावसाळ्यात जादा पाऊस झाल्यास त्यावेळी थोडा गॅप पडतो. तरी वर्षातून ६ ते ७ वेळा कोथिंबीर घेतो. एकावेळी ४०किलो बीयाणे टाकतो.साधारण १ किलो धन्यापासून १२५ गड्डी उतारा मिळतो.

कोथिंबीर आणि शेवग्याची मशागत, मजुरी वर्षाला २ गडी (१०० रू. हजेरीप्रमाणे ७२,०००) आणि बियाणे, औषधे, काढणी असा सर्व खर्च १ लाख रू. झाला तरी शेवग्यातील आंतरपीक कोथिंबीरीचे वर्षाला ६० हजार रू. पालकाचे १० हजार रू., बांधणे लावलेल्या कढीपत्त्याचे ८ ते १० हजार रू., १ गुंठ्यातील पुदिन्याचे आठवड्याला २०० ते ३०० रू. मिळतात. तसेच १ ते १ ।। गुंथ्याम्ध्ये शेवग्यातच लावलेल्या आळूपासून वर्षाला ८ ते १० हजार रू. मिळतात अशा पद्धतीने सर्व खर्च वजा जाता या आंतरपिकांतून २० ते ३० हजार रू. नफा मिळतो.

आम्ही ही शेवग्याची लागवड केल्यानंतर ८ महिन्यांनी बाजारात माल नेण्याइतपत तोडणी सुरू झाली. झाडाला शेंग भरपूर लागली, परंतु शेंग तोडायची सुरवातीला माहिती नसल्याने काठीला विळा बांधून शेंगा तोडत असे. काही दिवस काठीला आकडी करून शेग तोडत असे. या दोन्ही प्रकारामध्ये शेंगा तोडताना शेवग्याच्या फांद्या मोडत असत. त्याचबरोबर कोवळ्या शेंगाही तुटत असल्यामुळे कोवळी शेंग २५% वाया जात असे.

गेल्या चार वर्षापूर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ओफिसमधून औषधे घेऊन जात असताना स्वारगेटला नाईक यांच्या दुकानासमोर एक माणूस काठी घेऊन उभा होता. त्याला त्याबद्ल माहिती विचारली असता त्याने शेवगा शेंगा तोडणीची आहे, असे सांगितले त्यावरून ती कशी वापरायची याबद्दल माहिती करून घेतली. १० फुटाची काठी १ किलो वजनाची होती. त्यावरून १० फुट आणि १५ फुटाच्या अशा दोन काठ्या नेल्या. गेली ४ वर्षे त्या शेंगा तोडणीस वापरात असून त्यास नंतर काहीही खर्च आला नाही. त्या काठीने पाहिजे ती शेंग कितीही दाटी असली तरी सहज तोडता येते. त्यामुळे कोवळी शेंग वाया जात नाही. पक्क शेंग काढल्याने वजनात वाढ झाली. पावशेरमध्ये २-३ शेंगा सव्वा फुट लांबीच्या बसतात.

बेरोजगारास नवीन उद्योग


चांदणी चौकात (पिरंगुट रोडवरील) दोन तरूण हातगाडीवर शेवग्याच्या शेंगाची (बोटाएवढे दोन तुकडे असलेली रश्याची) भाजी व दोन वडापाव १५ रू. ला विकणारे आमच्या शेवग्याची लज्जत कळल्यावर ते आमचा शेवगा चालत्या (Moveable) हातगाडीवरच्या ढाब्याच्या व्यवसायासाठी विकत घेण्यास आले होते.

डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांशिवाय इतर कोणतीच औषधे वापरत नाही . परंतु एक वर्षे काळा मावा झाला असल्याने या पंचामृत औषधात रोगर वापरून फवारणी केली. त्यामुळे काळ्या माव्याचा नाश झाला.

मी स्वतः शेवग्याला रोग नसला तरी दर महिन्याला आता सप्तमृताची फवारणी देत आहे. रोगांची समस्या उदभवल्यास शेवग्याच्या पानावर बारीक आली होते. त्यावेळी मी सरांना विचारून कोणते औषध वापरायचे व किती प्रमाणता वापरायचे हे मी नेहमी विचारून फवारतो.

मी शेवग्याला शेणखत वर्षातून एकदा आणि कल्पतरू खत दर तीन महिन्याला शेवग्याच्या प्रत्येक झाडाला २५० ग्रॅम प्रमाणे बुंध्याच्या (वरंब्याच्या) दोन्ही बाजूस खोल रेघा मारून देतो.

मुख्य पिकास पाण्याचा व
आंतरपिकास फवारणीचा खर्चच नाही


विशेष म्हणजे शेवग्यास स्वतंत्र पाण्याचा व कोथिंबीरीस स्वतंत्र सप्तामृताच खर्च येत नाही. शेवग्यावर औषध मारताना खाली जे आंतरपीक असते त्यावर सप्तामृत आपोआपच पडते. त्यामुळे औषधासाठी स्वतंत्र खर्च करावा लागत नाही. तसेच आंतरपिकास पाणी द्यावे लागत असल्याने वारब्यांवर असलेल्या शेवग्यांना आपोआप टेक पाणी मिळते
आपल्याकडे बाराही महिने कमी अधिक प्रमाणात शेंगा चालू आहेत. शेंग सव्वा ते दीड फुट लांबीची, कलर हिरवागार, चमक आकर्षक असल्याने हडपसर मार्केट ला लगेच खपते. मार्केटमध्ये ५ किलोचे बंडल बांधून विकतो.

काही शेंगांची आम्ही पती-पत्नी सकाळी आठ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शेवग्याचा झाडाखाली शेंगा विकतो. बाजारात जो भाव असेल त्याच भावात ताजी शेंग विकतो. २० रू. पासून १२० रू. किलोपर्यंत बाजारभाव चालू वर्षी घेतला आहे. १२० रू. बाजारभाव ऑक्टोबर २००९ मध्ये घेतला आहे. सरासरी २५ ते ३० रू. किलो भाव मिळतो.

या शेंगाबरोबरच शेतात पिकणारा भाजीपाला कोथिंबीर, मेथी,पालक, कांदापात, पुदीना, अळू, कढीपत्ता या सर्व शेवग्यातील आंतरपिकांची विक्री बागेतच करतो.
माझो वय ७४ वर्ष आणि पत्नीचे ७२ असून या रोजगारापासून आमचा चरीत्रार्थ व्यवस्थित भागतो. दिवसाला २५० ते ३०० रू. ची विक्री होते.

या शेवग्यापासून वर्षला कमी अधिक बहारापासून ६० हजार ते १ लाख रू. नफा शिल्लक राहतो.

किरकोळ मार्केट मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आम्ही जागेवरच शेतात माल विकतो. सुरुवातीला पहिल्यावर्षी ५ रू. किलोने विकला तर आज लोकांना शेवग्याची चव आवडल्याने २५ ते ४० रू. किलो भावाने शेंग विकली जात आहे.

आमच्या अनुभवावरून इतर पिकांपेक्षा 'सिद्धीविनायक' शेवगा हे पीक कमी कष्टात, कमी खर्चात, कमी पाण्यावर एकदम खात्रीशीर उत्पादन व बाजारभाव देणारे पीक आहे. त्यामुळे हे पीक कमी क्षेत्र असलेल्या छोट्या कुंटुंबाचा मोठा आधारस्तंभ आहे!

New Articles
more...