'सिद्धीविनायक' शेवगा (मोरिंगा) शेतकऱ्यांचा सच्चा सोबती

प्रा. डॉ. वि. सु. बावसकर

शेवग्याचे उगमस्थान भारत असून त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला. शेवगा हे शेंगवर्गीय भाजी पीक. तसे हे अतिशय दुर्लक्षीत. अंधश्रद्धेमुळे किंवा चाकोरी बाहेरील भाजीवर्गीय पीक असल्यामुळे आम शेतकऱ्यांचे तसे काळजीपुर्वक व्यापारी पीक म्हणून २० व्या शतकातील ६० च्या दशकापर्यंत देशाला माहित नव्हते. मात्र अनेक आफ्रिकन राष्ट्रांमध्ये या पिकाचा उपयोग लोकांना माहित होता. पारंपारिक पद्धतीने अनेक दशकांपासून पाणी शुद्धीकरणासाठी आफ्रिकन राष्ट्रांत याचा सर्रास वापर होत असल्याचा उल्लेख आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाला दक्षिण भारतातील द्रविड लोकांना प्रथा म्हणून लवकर उमगले असावे. त्यांचा पारंपारिक अल्पोपहार, आहार यामध्ये सर्रास शेवग्याचा वापर होऊ लागला. कारण उष्णतेने तेथे बद्धकोष्टता शिवाय मसाल्याचे माहेरघर दक्षिण भारत असल्याने त्याचा वापर अधिक व त्यामुळे बद्धकोष्टतेवर, सहज आयुर्वेदोपचार म्हणून शेवग्याचा वापर 'कॉमनमॅन' झाला. त्यामुळे आहारामध्ये शेवग्याचे महत्त्व अनन्य साधारण झाले. दक्षिणेकडील परसात जसे कढीपत्त्याचे झाड असते, तसे शेवग्याचे असतेच. महाराष्ट्रातील राज्य जसे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये एवढी सजगता (जाण) ७० च्या दशकापर्यंत आलेली नव्हती.

१९९० ते ९५ च्या सुमारास अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर, चिंतनानंतर असे लक्षात आले की, महाराष्ट्रामध्ये हे पीक अतिशय दुर्लक्षीत आहे. अंधश्रद्धेमुळे याची लागवड दुरावली आहे. ज्यावेळेस मार्केटचा अभ्यास करण्यात आला तेव्हा आम्ही लोकांच्या असे लक्षात आणून दिले की, कमीत - कमी निच्चांकी भाव १० रू. ते उच्चांकी १०० रू. चा दर प्रती किलो म्हणजे याला दर हा सरासरी २० पासून ४० ते ५० रू. किलो मिळतो. बरं तसे पाहिले तर या पिकाला जमिन हलकी, मध्यम पोयट्याची व इतर धानपिकाची चालते. अधिक चिकणमाती किंवा अधिक क्षाराच्या (मुक्त चुना ५.५ टक्क्यापेक्षा अधिक, Na, So4, No3, Co3, Hco3, Ci इ.) जमिनीचे या पिकास वावडे आहे. शेवग्याला २५ डी. ते ४० डी. - ४२ डी. सेल्सिअस तापमान अनुकूल आहे, इतके उच्च तापमान कोणत्याही भाजीपाला पिकाला अनुकूल नसते. अति पाऊस किंवा ओलावा या पिकास मानवत नाही. धानपीक (सोयाबीन) जेथे एकरी २ -३ क्विंटल उतारा देते आणि याचे बाजारमुल्य हे साधारण ४ -७ हजाराच्यावर उत्पन्न येत नाही, तेथे या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी झगडा करूनही इतर पिकाच्या तुलनेत हे पीक अधिक उत्पादन देवू शकते. दक्षिण भारतातील कोईमतूर कृषी विद्यापीठाने कोईमतूर १ व २ या जाती विकसीत केल्या आणि शेवग्याचा वापर दक्षिण भारतात जास्त होत असल्याने दक्षिण भारतातील या विद्यापीठानी बऱ्यापैकी योगदान दिले. शेवग्याचे स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिकू, सिताफळ, आवळा, चिंच यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. या फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो व त्यातही मेथी, कोथिंबीर यासारखे भाजीपीक आंतर - आंतर पीक घेता येते.

चिनी लोकांनी 'सिद्धीविनायक' शेवग्याची चव घेऊन त्यांची जिज्ञासा जागृत होऊन 'सिद्धीविनायक' शेवग्याचे बी आपल्या देशात नेऊन त्याची लागवड केली व 'सिद्धीविनायक' शेवग्याला आज जगाच्या उच्च पातळीवर असणाऱ्या चीनच्या अंत:करणात स्थान मिळाले. ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या विज्ञानाला जगाने दिलेली दाद नाही का ? व जगाला भेटच म्हणावी लागेल.

देशातील हवामानामध्ये झालेले अतिरीक्त (Irratic) बदल, पावसाचे कमी- अधिक मान, पारंपारिक पिकांच्या उत्पादनात झालेली घसरण, संकरित आणि रासायनिक खते व किटकनाशकाने खराब झालेल्या जमिनी, शेती मालाच्या भावाची निसर्गाने व नेत्यांनी, दलालांनी व कमिशन एजंटनि केलेली धुळदाण त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी आलेले अठराविश्व दारिद्र्य या सर्व परिस्थितीचा साकल्याने संशोधक वृत्तीने अभ्यास करून महाराष्ट्रात व देशाच्या दुष्काळी भागात आम्ही नुसते रुजविले नाही तर प्रदिर्घ संशोधनातून 'सिद्धीविनायक' शेवगा याच जातींमधून विकसीत करून बिहारपासून ते उत्तरांचल व राजस्थानपासून ते केरळपर्यंत शेवग्याची लागवड केली गेली. याची शिफारस मुख्य पीक म्हणून केली असली तरी शेतकऱ्यांनी या पिकाची अर्धा ते एक एकर जास्तीत जास्त २ एकराहून अधिक लागवड करू नये. याचे कारण शेवग्याची छाटणी, पाणी, खते, रोगकिडी निवारण या साऱ्या गोष्टी कमी शिकलेल्ला सामान्य शेतकरी विश्वाला अजून नवीन - नवीन असल्या तरी दहा हजारहून अधिक मॉडेल्सनी 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या लागवडीचा श्रीगणेशा केल्याने छत्तीसगडसारख्या अदिवासी राज्यात श्री. विनायक मानापुरे (छत्तीसगड) तसेच अनेक राज्यांतील कृषी अधिकाऱ्यांनी या शेवग्याची रोपे तयार करून आदिवासी भागात वाटून प्रसार केला आणि इतर कोणत्याही वाणाची रोपे न घेता 'सिधीविनायक' शेवग्याचे उत्पन्न, दर्जा याचा अभ्यास करून तेथील लोकांना तो अतिशय भावला. गिऱ्हाईक याचीच मागणी करू लागले. "सर का शेजना, अपना शेजना" असे म्हणू लागले. छत्तीसगडसारख्या आदिवासी भागात या तंत्रज्ञानाचे हे फळीतच होय. यात श्री. मानापुरे यांच्यासारख्या शेती अधिकाऱ्याचे मोलाचे श्रेय आहे. महाराष्ट्रातील अधिकारीदेखील याप्रकारे आपने योगदान देत आहेत. विभागीय जिल्हा वन अधिकारी (Divisional Forest Officer) देशाच्या विविध राज्यातील तज्ज्ञ, विशेषज्ज्ञ, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी यांनी या योगदानाला हातभार लावून यशस्वी करण्यात मोलाचे सहाय्य केले व 'सिद्धीविनायक' शेवग्याला लोकाभिमुख केले. येथे बँक अधिकारी व कृषी अधिकारी, अधिक्षक कृषी अधिकारी, सहसंचालक व संचालक यांना अशी सुचना करावीशी वाटते की, कर्ज प्रकरण करताना या पिकाला प्रकल्प रिपोर्ट करतान ठिबकवर अवाजवी भर न देता बँकेचे अधिकारी, कृषी अधिकारी यांना यावर प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. हे प्रशिक्षण आम्ही आमच्या संस्थेमार्फत देऊ. या पिकाला खत, पाणी आणि रोग- कीड, छाटणी ही बाबा जरा क्लिष्ट असल्याने त्यावर आम्ही मार्गदर्शन करू. आमची कृषी विज्ञान केंद्रे यासाठी सज्ज आहेत.

अनेक ठिकाणी हे पीक नवखे वाटत असल्याने कुटुंबातील घटक शेवगा लावू नये असे म्हणणारे वडीलधाऱ्या मंडळींनी कृषी विज्ञानमधील अनुभव वाचून देशभर या शेवग्याची लागवड आम्ही राबवलेली पाहून सटाण्यासारख्या दुष्काळी भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने या 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड २।। एकरात करून त्यापासून ५।। लाख रू. मिळविले. हा शेवगा लंडन, कुवेतला निर्यात झाला. त्याचा फोटो कव्हरवर दिला आहे. हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे फलित साऱ्या राष्ट्राला व मानव जातीला प्रेरणा देईल. तरी हे पीक अधिक पैसे देते या भ्रमात न राहता लोकोंनी याचा कांदा, बटाटा, टोमॅटो, कापूस, ऊस होऊ देऊ नये. म्हणून विकास अधिकारी, तंत्रज्ञ, अभियंते यांनी यावर चिंतन करून नुसतीच या शेवग्याची शिफारस न करता अनेक प्रक्रिया उद्योग, औषधोद्योग निर्माण करून यापासून मानवजातीचे कल्याण कसे करता येईल ते पहावे. त्यांना आमचे सहकार्य सतत राहील.

शेवग्याच्या पानांची पावडर, बियांची पावडर, बियापासून बेन ऑईल सारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून तर बियांची पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते. बियापासून बनविलेल्या बेन ऑईलचा वापर घड्याळे व इतर इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो.

New Articles
more...