वरकस, पडीक, खराब जमिनीतील शेवगा

सिद्धी विनायक मोरिंगाची झाडे खडकावर तेजदार

अड. यशवंत गणपतराव शिंदे ६३१, गणेशपेठ, भोर, जि.पुणे फोने:(०२०) ५६०२४६३३, ९८२२५२१७२७

सिद्धी विनायक मोरिंगा शेवग्याची ८ पाकिटे आपल्याकडून नेली. बी मे २००४ मध्ये नेले होते. जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून रोपे तयार केली. जवळजवळ ७०० रोपे तयार झाली. पहिला पाऊस संपून गेल्यानंतर लागण केली. कल्पतरू वापरले. पंचामृताच्या दोन फवारण्या केल्या. लागवड ८' x ६' वर आहे. जमीन खडकाळ आहे. आता झाडे कंबरे एवढी, मस्त, तेजदार आहेत. मध्यंतरीच्या फार मोठ्या, न उघडणाऱ्या पावसाने रानात पाणी साचले. त्यामुळे काही रोपांची मर झाली. म्हणून १ पाकिट पुन्हा सिद्धीविनायक मोरिंगा शेवग्याचे नेऊन रोपे तयार केली. ही रोपे मेलेल्या रोपांच्या जागी लावणार आहे.

सरांनी शेवग्याच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे झाडाचा शेंडा कट केला होता. झाडे चारी बाजूने २।। ते ३ फुटाच्या घेराची आहेत. त्यामुळे आता ती दाट वाटत आहेत. त्याला पाट केलेत आणि मधल्या पट्ट्यात कारली लावली आहेत. कारली गोल्डनची विग्रो विशेष आहेत. लागवड १५ - २० दिवसापुर्वीची आहे. जर्मिनेटरचा वापर केल्याशिवाय आता कुठल्याच बियाची लागवड करत नाही. सध्या काही वेळ वीतभर तर काही १ फुट लांबीचे आहेत.

नटखट जमिनीतील शेवग्यासाठी

पंचामृत व कल्पतरू


श्री. वेणुनाथ सूर्यभान गोंदकर शिर्डी, ता.राहता, जि. अ.नगर. फोन:(०२४२३) २५७०५७

मी १ एकर चुनखडीच्या जमिनीत शेवग्याची १०' x ९' वर सप्टेंबर २००१ ला लागवड केली. शेवग्याची पाने पिवळी पडलीत, वाढ खुंटली. फुल अजून लागले नाही, बी संगमनेहून घेतले होते. आपले मोरिंगा नव्हते. आता त्यावर उपाय म्हणून पंचामृत व कल्पतरू नेणार आहे. शेंडा मारायचा आहे. तो आज उद्या मारून फवारणी आपण सांगाल तशी करतो. जमीन खारवट सामू (ph) ८.९२, विद्युत वाहकता ०.६, मुक्त चुना Ec(CaC03) ११.७३ % अशा नटखट जमिनीतील शेवगा आपल्या तंत्रज्ञानाने काढणार आहे. २ एकर कांदा आहे. आज कांदा आणला आहे. भाव मात्र २५० रू. क्विंटल त्यामुळे जरा नाराजी आहे.

खारट पडीक जमिनीत मोरिंगा शेवगा

श्री. उमेशसिंग वेडू गिरासे, मु.पो. भडणे, ता. सिंधखेडा, जि.घुके फोन:(०२५६६) २२५२१९

'कृषी विज्ञान' मासिक वाचून शेवगा १ एकर खारट पडीक जमिनीत लावला. या जमिनीत खारटपणामुळे इतर पिके चांगल्या प्रकारे वाढत नव्हती. शेवग्याला पंचामृत व कल्पतरू खताचा वापर केला. त्याचा अतिशय चांगला फायदा झाला.

खारी, चोपण जमीन असल्यामुळे अशा जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. अशा चोपण जमिनीचा उपयोग फक्त खेडेगावातील सामान्य माणसे आपल्या धाब्याच्या घरावर जेथे धाबे शाकारण्यासाठी बांधावरील बेढ्याचे दांडे (पटावा) वापरतात व त्या घरामध्ये रात्री झोपताना त्याची पावडर अंगावर पडते म्हणून मध्यम वर्गीय शेतकरी कडूनिंबाचे खांब आणि त्याचे पाटे छप्पर शाकारण्यासाठी वापरतात. कडू निंबाचा गुणधर्म कडू असल्याने त्याला कीड लागत नाही व पाट्यावर खारी टाकली तरी पाटे वाकत नाहीत.

अशा वाया गेलेल्या जमिनीत मी एक एकर मोरिंगा शेवगा सरांच्या मार्गदर्शनाने केला आहे. ३० मे ला पिशव्या भरून बी लावले. १५ जुलैला लागवड केली. त्या जमिनीत ८' x ८' अंतरावर खड्डा घेऊन त्यामध्ये दुसरीकडील २ घमेली काळी माही आणि ५० ग्रॅम कल्पतरू खत टाकले होते. लागवडीनंतर पंचामृताच्या २ फवारण्या केल्या. रोपे दोन फुटाची झाली आहेत. २।। फुटाची झाल्यानंतर शेंडा मारणार (छाटणार) आहे. मंडणगड तालुक्यात (रत्नागिरी) ३५ वर्षे दवाखाना चालविला. घरी लक्ष देण्यासाठी सध्या धुळ्याला राहत आहे.

New Articles
more...