विविध पैलुसाठी 'कृषी विज्ञान' आणि कार्यशाळेतून 'सिद्धी-विनायक' मोरिंगा लागवडीची प्रेरणा
																
																	मोरिंगा लागवडीची प्ररणा
																	
																	मोरिंगाच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा
																	अंक वाचून अर्धा एकर
																
																
																सिद्धी विनायक शेवग्याची लागवड
																श्री.महादेव रामचंद्र घोटे कोऱ्हाळे बु ।।, ता. बारामती
																जि.पुणे फोन: (९५२११२)२७२५८७
																मी शिरसणे येथे प्रायमरी टिचर आहे. जर्मिनेटर वापरून सिद्धी विनायक मोरिंगा शेवगा लावला.
																शेवगा एक नंबर उगवलाय. डायरेक्ट बी लावले. मध्यम प्रतीची जमीन आहे. ५० रू. चा विशेषांक
																घेऊन अभ्यास करून चिंतन केले. त्यामुळे आपला मोरिंगा शेवगा (सिद्धी विन्याक ) लावण्यास
																उद्युक्त झालो. शेवग्याचा भाव आता ४/१/२००४ रोजी २०० रू./१० किलो आहे. किसान २००३ प्रदर्शनात
																स्टॉलला भेट दिली. कृषी विज्ञानची १० मासिके नेली. मासिकातून भरपूर घेण्यासारखे आहे.
																त्यामध्ये उत्कृष्ट असे अनुभव संपन्न शेतकर्यांचे लेख आहेत. आज अर्धा एकर मोरिंगा
																शेवगा वाढवायचा (नवीन लावायचा) आहे. ५ पाकिटे अजून घेत आहे. १२५ रू. प्रमाणे ६२५ रू.ची
																५ पाकिटे घेतली आहेत. सतत तरकारी करायचो. पण भाव व मजुरी, मेहनत करून हाती काही लागत
																नाही म्हणून सरांनी लिहिलेले 'शेवगा - शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवेल' हा
																लेख वाचला व खरोखरच ते खरं आहे, अशा अनेक मुलाखाती वाचल्यावर माझ्या लक्षात आले.
																
																शेवग्याचे विविध पैलूंसाठी कृषी विज्ञान 
																
																रविंद्र सदाशिव साळुंखे, एम - ५६, एम.आय.डी.स., सातारा
																आम्ही प्लॅस्टीक बॅगा तयार करणारे उद्योजक. शेतीचा अनुभव नाही.परंतु शेतीची आवड असल्याने
																डॉ.बावसकर सरांचे 'कृषी विज्ञान' मासिक वाचनात आले. त्यात दिलेली शेवग्याविषयीची माहिती
																लागवडीस उद्युक्त करणारी, प्रेरणादायक असल्याने शेवगा लागवड करावयाचे ठरले. त्याप्रमाणे
																पुण्यास जाऊन १० पाकिटे सिद्धी विनायक शेवग्याच्य बियांची आणली. दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे
																हे बियाणे जर्मिनेटरमध्ये भिजवून व्यवस्थित लावले असता ९६ टक्के उगवण जोमदार झाली.
																(एरव्ही साधारणपणे ५० ते ६० टक्के होते) यातील ४०० रोपे फॅक्टरीच्या आवारात लावली असून
																राहिलेली ५६० रोपे दुसरीकडे लावली आहेत. आता झाडे अडीच फुट उंचीची असून व्यवस्थित आहेत.
																हा आमच्यासाठी नाविन्यपुर्ण प्रयोग शेतीतील माहिती नसतानाही केवळ 'कृषी विज्ञान' मासिक
																व डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे यशस्वी झाला. झाडांवर आता कृषी विज्ञान मासिकातील माहितीप्रमाणे
																पंचामृत फवारणी करीत आहोत. या शेवग्यामध्येच कोरफड व ग्लॅडिओलायची लागवड करणार आहे.
																शेवगा कार्यशाळेतून शेवगा लागवड
																श्री. दिपक विश्वनाथभाऊ जगदाळे, मु.पो.शिरवाडे, ता.कराड, जि.सातारा
																
																शेवगा गेल्या वर्षी अर्धा एकर आपले मार्गदर्शनाने केला होता. जमीन भारी काळी आहे. गेल्या
																जुलै २००० ला कल्पतरू वापरू शकलो नाही. पंचामृत ४ ते ५ वेळा वापरले आहे. तसेच निंबोळी
																अर्क थोडा वापरला आहे. त्यात आंतरपीक घेवडा (सिलेक्शन) आणि वांगी महिको १० नंबर होती.
																त्यालाही पंचामृत आपोआप मिळत होते. वांग्याचे व घेवड्याचे मिळून २० हजार झाले. भाव
																त्यावेळेस पडले होते. वांगी तर १० रू / १० किलो होती. पण काही वेळी हात विक्री केल्याने
																बरे पैसे झाले. निम्म्यापेक्षा अधिक शेवग्यास ८ ते ९ महिन्यात २०० ते २५० शेंगा लागून
																कराडला सरासरी १५ रू. ने हातविक्री केली. कधी २० रू. किलो तर कधी १२ रू. ने ही शेंगा
																विकाव्या लागल्या.
															
