'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !

अर्थशास्त्रा- ८ ते १० महिन्यात एक झाडास ३०० शेंगा लागतात. शेंगांची तोडणी झाल्यानंतर ते झाड पेन्सिलच्या आकाराचे फांदीपर्यंत वरून छाटावे. त्यानंतर एक महिन्यात झाडास फुले लागतील. १३ ते १६ व्या महिन्यात ३५० ते ४५० शेंगा पुन्हा मिळतात. तेव्हा शेवग्यापासून एक हंगामामध्ये २९,५७० किलो उत्पन्न मिळते. सर्व खर्च वजा जाता एकरी ४० ते ६० हजार रुपये दरवर्षी सहज मिळतात.

सोलापूर जिल्हयातील शेतकर्‍याने वरील तंत्रज्ञानाचा वापर करून अर्ध्या एकरमध्ये ६'x ६' अंतरावर शेवग्याची लागवड करून सोलापूरसारख्या कमी क्रयशत्की असलेल्या जिल्हयामध्ये प्रती शेंग ५० पैसे या दराने विक्री करून एका झाडापासून १५० रू. पहिल्या ८-९ महिन्याचे तोड्यात मिळविले. तेवढेच परत १४ व्या महिन्यात मिळविले. इतर जिल्ह्याचे ठिकाणी शेवगा पाठविल्यास २ रू. ते ५ रू. पावशेर दराने विक्री होऊ शकते. तेव्हा शेवग्यापासून कमीत कमी एकरी ६०,०००/- रुपये या टेक्नॉंलॉजीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने मिळविता येतात.

द्राक्षे, बोर, डाळींब यासारख्या पिकांचे प्रतिकूल परिस्थितीतील बदलामुळे अतोनात नुकसान होते. त्याकरता एकरी ५०,०००/- ते १,२५,०००/- रू.पर्यत भांडवली खर्च येतो. अशा नुकसानीमुळे गेली ४ वर्षापासून ह्या पिकांच्या बागांचे प्रमाण घटत आहे. द्राक्ष पिकांच्या मांडवांचा वापर आता पडवळ, कार्ली इ.पिकांसाठी होत आहे. परंतु या पिकांचे दर अनिश्चित आहेत. यातून मार्ग काढण्याकरिता शेवगा हे पीक फायदेशीर आहे.

मार्केट- गुजरात येथे शेवग्याची मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच इंदोर, ग्वाल्हेर, मद्रास, केरळ संपूर्ण दक्षिण भारत, उतरप्रदेश येथे निर्यात करण्यासाठी हे पीक उपयुक्त आहे.

शेतकर्‍यांनी माल आल्यानंतर शिस्तबध्द विक्री करणे, विविध कृषी उत्पन्न बाजार समित्या, मार्केटिंग बोर्ड यांनी शेंगा ताज्या कमीत कमी १० ते १५ रू. किलो होलसेल दराने कशा विकल्या जातील हे कटाक्षाने पहायचे आहे. त्याखाली विक्री होणार नाही याचे पथ्य पाळावे कारण शेवगा गिऱ्हाईकांना बाजारात १५ ते २५ रू. किलोच्या खाली मिळत नाही.

कमवा आणि शिका या योजनेखाली गरीब मुलांनी काही शाळेच्या जमिनीत शेवगा पीक करावयाचे म्हणून मोरिंगा शेवग्याचे बी शिक्षिकांनी नेले. मुलांनी ते जर्मिनेटरमध्ये भिजवून पिशवीत लावले. उगवण उत्तम झली. विविध संस्थांना ज्यांना अनुदान अपुरे अथवा अजिबात मिळत नाही त्यांनी शेवगा लावून मिळणार्‍या उत्पन्नात काही अंशी खर्चाची गरज निश्चितच भागविता येईल खात्री आहे.

शेवग्याचे विविध स्तरावरील प्रकल्प
शेवग्याची लागवड सध्या विविध उद्देशाने होत आहे. उदा.१) नांदेड (सिंहगड रोडवरील ), जि.पुणे येथील श्री.विक्रमसिंह जाधवराव या शहरी भागातील प्रगतीशील शेतकर्‍याने अर्धा एकर क्षेत्रावर शेवगा लागवड केली असून यावर्षी जागेवरच १४ रू. किलो होलसेल दराने शेवगा विकला आहे. यामध्ये मजुराअभावी तोडणीच समस्या नाही व मार्केटला नेण्याची अडचण नाही.

२) पिंपरी सांडसच्या ७-८ लोकांनी आमच्या जिल्हास्तरीय शेवगा मॉंडेलने शहरापासून ५०-६० कि.मी. अंतरावर शेवग्याची यशस्वी लागवड केली आहे.

अशा शेतकर्‍यांची ही यशस्वी लागवड पहाता मोठ्या प्रमाणावर सलग लागवड करण्याची योजना आखलेली आहे. अशा मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या शेवग्याचा आरोग्यदृष्ट्या प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास महत्वपूर्ण ठरेल.

New Articles
more...