'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !

वाफ्यात तयार केलेली शेवगा रोपे कायम जागी लावताना घ्यावयाची काळजी

काही वेळेस शेतकर्‍यांकडे शेवगा बियांची रोपे तयार करताना प्लॅस्टिक पिशव्या नसतात व त्यामुळे रोपे वाफ्यावर करतात. जर्मिनेटरची प्रक्रिया करून गादी वाफ्यावर रोपे केल्यास ती लवकर उगवतात. नंतर ते महिन्याभरात काढताना जारवा बर्‍यापैकी सोटमूळ मोठे लांब व त्यास बारीक मुळ्यासारखी पांढरी गाठ तयार होते. परत ही रोपे पुनर्लागण करताना जर्मिनेटरचे द्रावणात १० मिली जर्मिनेटर + १ चमचा प्रोटेक्टंट + १ ली.पाण्यामध्ये १०-१५ मिनिटे संपूर्ण बुडवून लावावी. लागवड करताना जमीन वाफश्यावर नसली व लागवड करताना रोपाला योग्य खड्डा घेऊन लागवड न केल्यास रोप कोमेजते. तसेच त्याला चहुबाजूने हाताने माती घट्ट दाबणे व मुळ्यांना हवा पिऊ देऊ नये. तसेच लागवड झाल्या झाल्या पाणी द्यावे. जर दुसर्‍या दिवशी ऊन पडून जमिनीला केसासारखी क्रेक (तडे) गेला तर मुळे हवा पिऊन रोप दगावते. म्हणून रोपांना परत जर्मिनेटरची हलकीशी नेहमीप्रमाणे चुळ भरावी. असे दर दिवसाआड करावे म्हणजे रोपे कोमेजणार नाहीत. पानगळ झाली तरी घाबरू नये. काडी सुकल्यासारखी वाटेल तरी चिंता करू नये. त्यास ८-१० दिवसात पुर्ववत फुट शेंड्याकडून व बगलेतून येत रहाते व अशा रितीने दक्षता घेतल्यास वाफ्यातील पुनर्लागणीची रोपे जीव धरतात व पाऊस न पडल्याने अशी रोपे वरील दक्षतेमुळे दिवाळीपर्यंत अथवा नाताळापर्यंत ती फुलावर येऊन ऐन थंडीत व उन्हाळ्यात शेवग्याचे पैसे होतील व परत रोहिणी नक्षत्राचे सुमारास २२ मे ला छाटणीस येईल.

शेवग्याची लागवड करताना घ्यावयाची दक्षता

शेवगा लागवड शक्यतो पिशव्यामध्ये रोपे तयार करून करावी. ४ ते ६ इंच आकाराच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पिशवीच्या तळापासून वरील टोकापर्यत एक इंच अंतर सोडून निचरा व्यवस्थित होण्यासाठी चार छिद्रे पाडावीत. एक ते दोन चमचे सेंद्रिय खत पिशवीमध्ये टाकून पिशवी भरावी व हळूवारपणे पाणी द्यावे. व जर्मिनेटर प्रोटेक्टंट मिश्रणाची प्रक्रिया केलेले बी अर्धा सेंमी खोल आडवे टोकावे. दरोज झारीने पाणी द्यावे. पंचामृताची प्रत्येकी ३ ते ५ मिलीची १ लिटर पाण्यातून फवारणी केल्यास बियांची उगवणक्षमता वाढून रोपे लवकर तयार होतात. मर होत नाही रोपे ९ ते १० इंचापेक्षा जास्त वाढू देऊ नये. कारण वार्‍याने, वादळाने शेंडा मोडण्याची शक्यता असते. तेव्हा दांडा कसा जाड होईल हे पाहणे. विशेष महत्वाचे म्हणजे बी अर्धा सेंमी पेक्षा खोल लावू नये. उगवण कमी होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर पाणी जास्त दिल्यास, पावसामध्ये बी लावल्यास बी आतमध्ये दबले जाऊन उगवण व्यवस्थित होत नाही. या बाबतीत प्रयोग करताना असे आढळून आले कि शेवग्याचे बी जोरदार पावसामध्ये लावले ता त्या बियांची उगवण झाली नाही . व जे बी पाऊस उघडल्यावर लावले त्या बियांची उगवण चांगली होऊन उत्कृष्ट रोपे तयार झाली. तेव्हा शेतकर्‍यांनी वरील दक्षता घ्यावी. शेवग्याची रोपे कायम जागी लावल्यानंतर साधारण अनुकूल परिस्थितीमध्ये म्हणजे चैत्रापासून भाद्रपदापर्यंत केलेल्या लागवडीमध्ये साधारण २ महिने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यास गुडघ्यापासून ते कंबरेपर्यंत वाढ होते. त्यावेळेस शेंडा फार वेगाने वाढत असतो. तदूवतच त्याच्या चौफेर फुट वाढते. अशा वेळेस बाजूची फुट ही पोपटी रंगाची असते. तेव्हा अशी फुट २ ते ३ पानावर असताना अंगठा आणि त्याशेजारील बोटाने छातावी. पाने गर्द हिरवी आल्यानंतर छाटली जात नाही. शेंड्याला येणारी फुट कोवळी असते. २ महिन्याची झाडे होईपर्यंत १५ ते २० दिवसांनी २ ते ३ वेळा छाटावीत. शेंड्याचा भाग हा उदूबत्तीच्या आकाराचा ते चुका चाकवतच्या देठासारखा मऊ असतो. अशा शेंडा व हाताच्या पंजासारखी बारीक निघालेली फुट ही साईड फुटीपेक्षा जास्त कोवळी ती २-३ वेळा काढावी लागते. म्हणजे झाडाच्या ४ थ्या ते ७ व्या महिन्यापर्यंत झाड छातीपासून ते डोक्यापर्यंत होत असून त्याला राजागिर्‍यापासून बाजरी, ज्वारीच्या आकारची भरपूर फुले लागतात. छाटणी ही २ ते ३ प्रकारे केली जाते. २५% छाटणी केलेल्या झाडांना ६०० ते ७०० शेंगा लागतात. दुसरी म्हणजे ५०% छाटणी केलेल्या झाडांना ३०० ते ३५० शेंगा आणि तिसर्‍या पद्धतीत ७५% छाटणी केलेल्या झाडांना १५० ते २०० शेंगा लागतात.

New Articles
more...