'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !

ग्रामीण आरोग्याच्या द्र्ष्टीने शेवग्याचे योगदान

ग्रामीण आरोग्य हे विशेष करून पाण्याशी निगडीत आहे. दुषित पाण्यामुळेच ग्रामीण भागामध्ये रोगाचे प्रमाण वाढते आहे. आम्ही अनेक ठिकाणी पाहणी करताना उसे आढळून आले आहे की, ग्रामीण भागामध्ये पाण्याने भरलेल्या डेर्‍यात तुरटी फिरवितात तर तालुकापातळीवर शहरांमध्ये ब्लिचींग पावडर व क्लोरिनेटेड वॉंटरचा वापर सर्रास केला जातो. परंतु अशा पाण्यामुळे लहान आतड्यामध्ये व्रण, आल्सर होणे, भूक मंदवणे, मूत्रपिंड व मूत्राशयाचे विकार, ज्वर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, कालांतराने तोतरेपणा येणे, असंबध्द बडबडणे, विचार प्रकट करणे अशा प्रकारचे विकास, समस्या उदभवण्याची शक्यता असते. यावर सोपा पर्यायी उपाय म्हणून शेवग्याच्या बियांचा वापर आपणास करता येईल. याकरिता १० ते १५ शेवग्याचा बियांची पावडर तयार करून डबल अशा जाड परंतु सछिद्र अशा ६'' x ६'' च्या कापडामध्ये गुंडाळून त्याला साध्या जाड दोर्‍याने बांधून पुरचुंडी तयार करणे व ही पुरचुंडी पाण्याने भरलेल्या घागरीत अथवा डेर्‍यात ६ टे ८ तास किंवा रात्रभर ठेवणे. पुरचुंडीचे एक टोक डेर्‍याच्या बाहेर राहील याची दक्षता घ्यावी. असे केल्यानंतर पाण्यातील घाण तळाशी जाईल व हे पाणी गाळून घेतल्यानंतर शुध्द पाणी म्हणून निर्धास्तपणे पिण्यास वापरता येईल. अशा प्रकारचे छोटे छोटे प्रकल्प ग्रामीण आरोग्य सुधार प्रकल्प, आरोग्य व ग्रामविकास खाते यांना वापरता येतील व ग्रामीण आरोग्य सुधारेल. त्यामुळे ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात शेवगा बियांना मागणी येईल.

आरोग्य संवर्धक शेवगा
शेवग्याची पाने व फुलांपासून चटणी तयार करता येते. तर कोवळ्या पानांची भाजी तयार करतात. ती अतिशय चविष्ट लागते. २ फुटापेक्षा जास्त लांबीच्या शेंगा ह्या विविध हॉटेल्समध्ये सांबर करिता चालतात, परंतु दीड ते दोन फुटाच्या शेंगा ह्या मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी सुलभ आहेत. वरील विवेचन केलेल्या व सध्या आम्ही शिफारस करीत असलेला सिद्धी विनायक मोरिंगा शेवगा हा ह्याच प्रकारचा असून अशा शेवग्यास मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

गुजरात सारख्या राज्यामध्ये शेवग्याची भाजी हमखास आमच्या आहारामध्ये वापरली जाते. शेवगा सकाळी आहारामध्ये असेल तर पचनसंस्था व्यवस्थित राहते. रात्रीच्या आहारामध्ये शेवगा असणे श्रेयस्कर आहे कारण शेवग्याचा हा उपयोग सारक म्हणून प्रभावी आहे.

मार्केट-
आज शेवग्याची जी कमी प्रमाणात लागवड आहे ती शेवग्याच्या मार्केटच्या दृष्टीने महत्व लक्षात आल्यामुळे तसेच आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरलेली असल्याने उद्या ही लागवड वाढत जाणार आहे. कारण या पिकास इतर पिकांच्या मानाने मेहनत कमी व फायदा जास्त आहे. आमच्या सर्व शाखांमध्ये इच्छूक शेतकर्‍यांना मार्गदर्शनासह लागवड करण्यासाठी बियांची उपलब्धता करून त्या त्या भागातील शेवग्याचे मॉंडेल प्लॉट पहाता येतील अशी व्यवस्था व्हावी अशी सदिच्छा आहे.

शेवगा लागवड शेतकर्यांनी का करावी ?
आज शेवग्याचे जागेवर होलसेलचे १२ ते १४ रू. भाव आहेत. हे भाव उद्या जर लागवडीखालील क्षेत्र एक हजारपेक्षा जास्त झाल्यास १० रू. किलोपर्यंत होण्याची शक्यता आहे. तथापि या पिकामध्ये मेहनत कमी, मजुरांची संखया कमी, देखभाल खर्च कमी, वाहतुकीस सोयीचे व कमी नाशवंत असे हे पिक आहे. गेल्या १५ ते २० वर्षामध्ये शेवग्याचे मार्केट अत्यंत उत्साही व नफ्याचे आहे.

New Articles
more...