'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !

म्हणून प्रचलित पद्धतीपेक्षा वर दिलेल्या प्रयोगामध्ये झाडांच्या फांद्यांचा विकास होऊने ते वाया न जाता खोड व फांद्यात जाऊन त्याला बाराही महिने शेंगा लागतात आणि १५ महिन्यात ६०० ते ८०० शेंगा लागतात. शिवाय त्यात आंतरपीक घेतले जाते. नियमित छाटणी केल्यामुळे झाड डेरेदार होऊन झाडांचे आयुष्य वाढते. झाडाचे क्रेकिंग होते नाही. शिवाय उन्हाळ्यामध्ये २ ते ४ महिने पालेभाज्यांचे आंतरपीक घेता येते.

अशा प्रकारची छाटणी वर्षातून ७ ते ८ वेळा करावी लागते. कोवळ्या फुटीची भाजी केली तर ती मेथी किंवा हरभर्‍याच्या भाजीसारखी चविष्ठ लागते आणि शेंगा काढल्यानंतर शेंडा तांबूस व पेन्सिलच्या आकाराचा तांबूस लवचिक सशत्क आणि शेंड्याकडील डोळा फुगलेला असल्यास छाटणी करू नये. मात्र ही फांदी ज्या मुख्य फांदीला जोडलेली असते त्याच्या १ ते २ वितीपर्यंत दोन्ही बाजूस निघालेल्या. अणकुचीदार,बदामी रंगाच्या उदूबत्तीच्या कडीएवढ्या वाळलेल्या फुटी अंगठा व शेजारील बोटाने दाबल्यास पटापट तुटतात. अशा सुकलेल्या फुटी फक्त काढाव्यात. उन्हाळ्यामध्ये शेंगा पोसत असल्याने आणि निघालेली फुले गळू नये म्हणून व त्यांना जून जुलैमध्ये जेव्हा भाव १८ ते २८ रू. पर्यत असतो तेव्हा शेंगा पोसण्यासाठी पंचामृत,प्रिझम, न्युट्राटोनचा वापर करावा म्हणजे पाण्याअभावी दुसर्‍या भाज्या कमी येतात. उष्णतेमुळे त्यांचा रंग बदलेला असतो. त्यांची चव बदलते. अशा अवस्थेत शेवग्याच्या भाजीला मागणी व दर ही सापडतात.

शेवग्याची भाजी डोळ्याचे, पोटाचे विकारावर ज्वर, बद्धकोष्टता यावर उपकारक ठरते. मात्र एरवी आपण या विकारावर डॉक्टरांकडे १००-२०० रू. घालवतो. त्यापेक्षा १०-१२ रू. मिळणार्‍या पावकिलो भाजीमध्ये सार्‍या कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहते.

New Articles
more...