शेवगा का?

सिद्धीविनायक शेवगा का?

यशोगाथा

यशोगाथा

अलीकडे असे ऐकले की शेवगा खाण्याने कावीळ होते पण ही चुकीची समजूत आहे. शेवगा हा उष्ण आहे हे खरेच पण त्याचा उपयोग विशेष करून वात किंवा कफ विकारावर होतो. याच्या कोवळ्या पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. याच्या शेंगा आमटीत वापरतात.

Read more

 1. Siddhi Vinayak Drum Stick Plant - The ‘KALPAVRUKSHA’ of Mankind
 2. 'सिद्धीविनायक' शेवगा हा साऱ्या जगाचा आवडता व आरोग्यदायक भाजी
 3. बहर शेवग्याचा, दराचा आणि आरोग्याचा
 4. मोरिंगा शेवगा आरोग्याचा दागिना तर गरिबांना अलिबाबाची गुहा
 5. मोरिंगा शेवग्याने माझ्या जीवनात क्रांती केली
 6. वकिली करण्यापेक्षा शेवग्याची शेती देते कष्टाचा पैसा व आत्मिक समाधान
 7. कमी पाण्यावर, दुष्काळी भागात शेवग्याची यशस्वी लागवड
 1. 'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !
 2. 'सिद्धीविनायक' शेवगा (मोरिंगा) शेतकऱ्यांचा सच्चा सोबती
 3. प्यायला पाणी नसताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी!
 4. 'सिद्धीविनायक' मोरिंगाची चव चीनी पाहुण्यांनी घेतल्यावर चीनला मोरिंगा लागवडीसाठी रवाना
 5. अत्यंत कमी पाण्यावर केशर आंब्यातील 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी
 6. सिद्धी-विनायक मोरिंगा शेवग्याचे भरघोस व दर्जेदार उत्पादन
 7. सरांचा मोरिंगा शेवगा मित्राचा जीवन आधार
 8. सावकारी कर्जाच्या विळख्यातून सरांचा 'सिद्धी-विनायक' शेवगाच तारेल - आईचा आत्मविश्वास
 9. 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या अनुभवातून परत सव्वा एकरात नवीन लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने
 1. 'सिद्धी-विनायक' शेवग्याने शेतकर्यांचा जीवनात घडविलेल्या यशस्वी घटना
 2. सिद्धी विनायक मोरिंगा शेवग्याच्या २ पाकिटांचा संसाराला आधार
 3. सरांचा शेवगा पुस्तकातून लागवडीची प्रेरणा - पूर्ण दुर्लक्ष होऊनही शेवग्याने दिली साथ
 4. प्रतिकूल जमीन व हवामानात ३० गुंठे क्षेत्रातून सतत सात वर्षे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे दरवर्षी १ लाख तर अंतरापिकांचे ४० ते ६० हजार - सार्या राज्याला एक आदर्श मांडेल
 5. ३० ते ३५ 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या झाडांपासून २ महिन्यात २० हजार
 6. १० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्यास ४ थ्या महिन्यात फुलकळी, ३ शेंगा/७ ते ८ रुपयास विक्री
 7. कोकणात एक एकरातून 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ६० - ७० हजार पहिल्या वर्षी उत्पन्न
 1. लावा शेतात सिद्धीविनायक शेवगा मोरिंगा, तुमचा भोवती पैसा घालील पिंगा..." पुस्तकाने दिली १०० गावांच्या ३ हजार शेतकर्यांना लागवडीची प्रेरणा
 2. "सिद्धीविनायक" शेवग्याच्या अनुभवातून परत सव्वा एकरात नवीन लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने
 3. दोन-तीन महिन्यात 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ६० हजार, शिवाय कैरीचे मार्केटिंग!
 4. १८ गुंठे मुरमाड जमिनीतील 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिले पहिल्याच वर्षी ७५ ते ८० हजार, दुसर्‍या वर्षी १ लाख
 5. सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा पहिल्या वर्षी ६० हजार, दुसर्‍या वर्षी १ लाख
 6. 'सिद्धीविनायक' शेवग्याचे १० गुंठ्यात २ वर्षात ९० हजार
 7. 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून १ एकरात ८० हजार ते १ लाख रू. नफा
 8. 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लंडन व कुवेतला निर्यात

डा.बावसकर टेक्नॉंलॉजी

कृषी मार्गदर्शिका

उपयोग आणि फायदे

हल्लीचा समस्या आणि उपाय

दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे, शेती उत्पादन घेण्यास शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहते. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर बदलत्या हवामानात विविध निविष्ठांचा योग्य वापर करून रोग-कीड मुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हे गेल्या २५ - ३० वर्षामध्ये शेतकर्‍यांच्या शेतावर विविध प्रयोग करून सिद्ध केले आहे....

Read more

 1. डा.बावसकर टेक्नॉंलॉजीने छत्तीसगडमधील शेताकार्यांच्या जीवनमानात वाढ
 2. डा.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान

Subscribe to Krushi Vignan Monthly Magazine Published by Dr.Bawaskar. Thousands of farmers are benefiting from this monthly which gives insights into cultivating various food crops, fruits and vegetables. Explaining various problems and their solutions.

Read the experiences of other farmers and contribute your own experience for the benefit of others.

Read more

शेंगा : शेवग्याच्या शेंगामध्ये पाणी ८६.९%, प्रथिने २.५ %, मेद ०.१%, कर्बोदके ३.७% , तंतू ४.८.% , खनिजे २.०%, ऑक्झॉंलिक आम्ल ०.०१% असते. १०० ग्रॅम गरामध्ये ३० मिलीग्रॅम कॅल्शिअम, ११० मिलीग्रॅम फॉंस्फारस आणि ५.३ मिलीग्रॅम लोह असते.

रदय, पक्षाघात, मिरगी, अर्धांग, लकवा जुन्या गाठी, रक्तसंचार या रोगांवर उपयुक्त. स्नायू आडकणे, स्नायू कमजोरी, उदरवायू तसेच पित्ताशयाचे (लिव्हर रोग), टेटॅनस, सांध्याच्या वेदना यांवर उपयोगी आहेत. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने रक्ताभिसरणाला उतेजन मिळते. शेवग्याच्या शेंगाने पोटातील जंत कमी होतात.

Read more

New Articles
more...

'सिद्धीविनायक' शेवगा मानव जातीचे कल्याण करेल!

आम्ही गेल्या २५ वर्षात देशभर केलेल्या प्रयोगातून आलेले अनुभव, निरीक्षणावरून नेहमीच सरस ठरला आहे. ज्यावेळेस कांदा - टोमाटोला २ - ३ रु. किलोहूनहि कमी भाव असतो, तेव्हा शेवग्याला १० रु. हून अधिक भाव असतो. तर एरवी तो ३० ते ६० रु. किलो असतो.

शेतकऱ्यांना गेली ५० - १०० वर्षापासून भाजीपाला उत्पादनाच्या बाजार भावातील अनिश्चिततेमुळे शेती व्यवसाय हा संपूर्णता आतबट्ट्याचा ठरत असल्याने पारंपारिक शेतीत काहीही तथ्य नाही हे अनुभवांनी सिद्ध झाले. पण माहिती तंत्रज्ञान नवीन पिढीत रुजवले तर ते त्याला साद - प्रतिसाद देतात हा अनुभव कामी आला. तेव्हा यातून बाहेर येण्याकरिता आम्ही 'सिद्धी - विनायक' शेवग्याचा (निवड पद्धतीने) शोध लावून प्रसार केला. त्याचे देशभर विविध जमिनीचे प्रकार, बदलते टोकाचे हवामान, पाण्याची दुर्भिक्षता असताना शेकडो प्रयोग केले. त्यामध्ये वरील सर्व परिस्थितीत शेवग्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तेव्हा आम्ही २० वर्षापासून सांगत आलो कि 'शेवगा - शेतकर्यांची आत्महत्या थांबवेल'.

देशभरामध्ये जवळपास ७० % जमीन ही मुरमाड, हलक्या प्रतिची असून बागायती शेती करण्यासाठी फक्त १३ ते १६% पाणी उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत शेवग्याचे प्रयोग केल्यानंतर आढळून आले कि, अशा निष्कृष्ट, कमी पाण्यावर शेवग्याचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. तसेच या शेवग्यास रोग - किडीचा प्रादुर्भ्राव भाजीपाल्याच्या तुलनेत फारच कमी आढळतो, तेव्हा याचा अवलंब देशभरातील शेतकर्‍यांनी करावा.

देशातील ५ एकराहून कमी क्षेत्र असणारा शेतकरी ८० % आहे. आणि त्यातील ६० % शेतकरी कोरडवाहू आहे. तेव्हा ५ एकरमधील एक एकर क्षेत्रामध्ये डां.बावसकर टेक्नालाजीने शिफारस केल्याप्रमाणे शेवग्याची लागवड करून डां.बावसकर टेक्नालाजीचा वापर करावा. ज्यांना २ एकर क्षेत्र आहे, त्यांनी किमान अर्धा एकर, तर एक एकर क्षेत्र असणार्‍यांनी ५ गुंठ्यामध्ये जरी शेवग्याची लागवड केली तर त्यामधून वर्षाला २० ते २५ हजारपासून ६० हजार ते १ लाख रु. उत्पन्न मिळून आर्थिक परिस्थिती सुधारते, असे अनेक शेतकर्यांनी देशभर अनुभवले आहे.

शेवग्याच्या विविध भागांचा (पाने, फुले, शेंग, मगज, बियातील मगज, खोडाचा डिंक ) मानवाचे टी.बी., कंसर, ज्वर, असीडीटी, मूळव्याधी, बद्धकोष्टता अशा व्याधींवर रामबाण ठरल्यामुळे शेवगा हे 'आयुव्रेदिक अन्न' झाले आहे. त्यामुळे त्याचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेवग्यास 'आरोग्याचा दागिना' म्हणले तर यतार्थ ठरेल.

'सिद्धीविनायक' शेवग्याची चव चीनी लोकांनी चाखल्यानंतर त्याचे बी चीनला लागवडीसाठी नेले, हे अतिशय बोलके उदाहरण आहे. देशभरामध्ये छत्तीसगढ, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्यात याची शेतकर्यांनी लागवड करून आपले जीवनमान उंचावल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया 'कृषी विज्ञान' मासिकात आम्ही वेळेवेळी दिल्या आहेत.

अमेरिकेत प्रत्येक नाण्यावर जसे We Trust In God असे न लिहिता In God We Trust असे लिहिले आहे, तसे आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेवगा थांबवेल असे न संबोधता 'शेवगा - शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल' ! असे सिद्ध केले. आता त्याही पुढे जाऊन दहा हजाराहून देशभर केलेल्या प्रयोगाच्या निष्कर्षांवरून अशी उक्ति सिद्ध हस्ते साकारली की, शेवगा सार्‍या मानव जातीचे कल्याण करेल...!